देशातील व्युव्हात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा व्हावा या उद्देशाने तीन केंद्रीय सार्वजनिककंपन्यांच्या भागभांडवलाने नुकतीच "काबिल - खनिज बिदेश इंडिया लिमिटेड" ची स्थापना केली गेली.
मुख्य मुद्दे:
काबिल मध्ये खलील तीन कंपन्यांचा सहभाग आहे.
- नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को), National Aluminium Company Ltd.(NALCO),
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड. Hindustan Copper Ltd.(HCL)
- खनिज अन्वेषण कंपनी (एमईसीएल). Mineral Exploration Company Ltd. (MECL).
उद्दीष्ट : देशांतर्गत बाजारपेठेला क्रिटिकल व स्ट्रॅटेजिकल खनिजांचा सतत पुरवठा करणे.
- “काबिल देशाच्या खनिज सुरक्षेची हमी देईल, तर आयात प्रतिस्थानाचे सर्वांगीण उद्दीष्ट साकार करण्यासही मदत करेल,
- या संयुक्त उद्यमातून लिथियम आणि कोबाल्ट सारख्या खनिजांचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.
- हे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील खनिज समृद्ध देशांशी भागीदारी वाढविण्यात मदत करेल.
- लिथियम, कोबाल्ट, टंगस्टन, व्हॅनियम आणि निकेल इत्यादींसह 12 खनिजांना सामरिक खनिजे म्हणून ओळखले गेले आहे. देशाच्या सुरक्षा आणि विकासात सामरिक खनिजे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात
- “काबिल विदेशातील मोक्याच्या खनिजांची ओळख, संपादन, अन्वेषण, विकास, खाण आणि प्रक्रिया या देशातील खनिजांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरेल.
- कोळसा, खाणी व संसदीय कार्यमंत्री : प्रल्हाद जोशी
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी