Search This Blog

Monday, 19 August 2019

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची फेरनिवड

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 16 ऑगस्ट 2019 रोजी रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषित केले
 • या त्रीसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती (CAC) मध्ये  कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांचा समावेश होता.
 • 2021 मध्ये भारतात होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम असतील.
 • कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. या शर्यतीत रवी शास्त्री यांच्यासह टॉम मुडी, माइक हेसन, लालचंद रजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमन्स शर्यतीत होते.
 • भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. फलंदाजांच्या सुमार दर्जाच्या कामगिरीचा फटक भारताला बसला होता. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते.
 • जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाने रवि शास्त्रीच्या प्रशिक्षणाखाली 21 कसोटी सामने खेळले, ज्यात भारताने 13 विजय मिळवले. टी -20 आंतरराष्ट्रीय 36 पैकी 25 जिंकल्या. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 60 पैकी 43 सामने जिंकले.
 • बीसीसीआयने आतापर्यंत भारतीय संघासाठी 16 प्रशिक्षकांची निवड केली आहे. यातील चार प्रशिक्षक परदेशी होते. 
 • बीसीसीआयने 2000 पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सात माजी क्रिकेटपटूंची निवड केली होती. त्यापैकी चार विदेशी आणि तीन भारतीयांचा समावेश आहे.
 • प्रशिक्षक रवी शास्त्री यांना गेल्या 19 वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

रवी शास्त्री
 • रवी शास्त्री हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहे.
 • त्यांचा जन्म 27 मे 1962 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला.
 • गेली तीन वर्षे ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. 
 • याआधीही त्यांनी जवळपास दोन वर्षे भारतीय संघाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
कारकीर्द :
 • 1981 ते 1992 या काळात त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.
 • अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख.
 • भारताकडून 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
 • 21 फेब्रुवारी 1981 रोजी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात प्रवेश. कसोटी कारकीर्दीत 80  सामन्यात 3830 धावा आणि 151 बळी.
 • 25 नोव्हेंबर 1981 रोजी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात.150 एकदिवसीय सामन्यात 3,108 धावा आणि 129 बळी .

स्रोत : लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स , द हिंदू 

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी