Search This Blog

Saturday, 24 August 2019

'वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाण भारतात' :‘ट्रॅफिक’ चा अहवाल.

‘Skin and Bones Unresolved: An Analysis of Tiger Seizures from 2000-2018’ या विषयावरील अहवालात युनायटेड किंगडममध्ये मुख्यालय असलेल्या ‘ट्राफिक’ च्या व्याघ्र व्यापारावरील मालिकेतील हा चौथा रिपोर्ट आहे. ‘ट्रॅफिक’ ही एक वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. नुकत्याच केलेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात वाघांची संख्या 2967 आहे.ही जगातील सर्वात जास्त संख्या आहे. जगभरातील एकूण वाघांपैकी 56 टक्के वाघ भारतात असले तरी वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाणदेखील भारतातच आहे. 2008 साली भारतात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आली.

अहवालातील महत्वाचे मुद्दे 

 • व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे 40.5 टक्के घटना या भारतातील आहेत.
 • 2000 ते 2018 या 18 वर्षांच्या काळात जगभरातील 32 देशांतून 2359 वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले, यात प्रामुख्याने हाडे, कातडी याचा समावेश आहे.
 • यामध्ये एकूण 1142 जप्तीच्या घटना घडल्या आहेत यापैकी 1086 (95.1%) घटना या 13 आशियाई देशातील आहेत.
 • या तेरा देशात दरवर्षी सरासरी 60 जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या.
 • वाघाव्यतिरिक्त अस्वल आणि हत्तीचे अवयव देखील मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आले. दरवर्षी सुमारे 58 वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. 2016 पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. 2016 ते 2018 या कालावधीत सरासरी वार्षिक 44 टक्क्य़ांपासून ते 73 टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.
 • वाघांच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणात एकूण किती आरोपींना पकडण्यात आले आणि त्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याची पूर्ण आकडेवारी नाही. मात्र, अहवालानुसार 591 प्रकरणांत सुमारे 10167 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 38 टक्क्य़ांपेक्षाही अधिक आरोपी भारतातील आहेत.भारतानंतर इंडोनेशिया आणि चीनचा नंबर आहे.
 • अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी 259 आरोपींवर तिन्ही देशात खटला चालवण्यात आला. यातील 17.4 टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.
भारताच्या बाबतीत

 • ताज्या जनगणनेनुसार भारताची वाघांची संख्या 2967 झाली आहे, तर ट्रॅफिक अहवालात 2016 च्या डब्ल्यूडब्ल्यूएफ च्या अंदाजानुसार 2226 लोकसंख्या वापरली गेली असून, जागतिक वन्य वाघाच्या लोकसंख्येपैकी 56% लोकसंख्या भारतात आहे.
 • सर्वाधिक जप्तीची घटना भारतात घडल्या (463, किंवा सर्व जप्तींपैकी 40%) तसेच 625 वाघ जप्त केले गेले.
 • जप्त केलेल्या शरीराच्या विविध भागांच्या बाबतीत, वाघाच्या कातडी ( 38%), हाडे (28%) आणि नखे आणि दात (42%) या देशांमध्ये भारताचा वाटा सर्वाधिक आहे.
 • 2016 मध्ये एकाच वर्षात 70 जप्तीच्या घटनांमध्ये जप्त केलेल्या वाघांची सर्वाधिक संख्या 288 होती.
 • थायलंडच्या वट फा लुआंग ता बुआ टायगर टेम्पल मध्ये 187 वाघांना जप्त केले होते. ही संख्या त्या वर्षात जप्त केलेल्या वाघांच्या 65% होती.
 • दरवर्षी 124 वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात भारत अग्रस्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे.
 1. भारत - 40.5 टक्के (463)
 2. चीन - 11 टक्के (126)
 3. इंडोनेशिया - 10.5 टक्के (119)
भारतातील जप्तीच्या घटना:
1)महाराष्ट्र (60)
2) उत्तर प्रदेश (54)
3) मध्य प्रदेश (54)
4) कर्नाटक (39)

स्रोत : TIMES OF INDIA ,THE INDIAN EXPRESS, THE HINDU, लोकसत्ता 

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी