Search This Blog

Monday, 5 August 2019

अवकाशाचा शांततामय कामांसाठी वापर करण्यात सहकार्य करण्याबद्दल भारत आणि बाहरीन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि बाहरीन यांच्यात अवकाशातील जागेचा शांततामय कामांसाठी वापर करण्याविषयी झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
  • भारताने बंगळूरु येथे बाहरीन सरकारने मनामा येथे मार्च 2019 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
सविस्तर माहिती
  • या करारामुळे अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान तसेच पृथ्वीशी दूरवरुन टेहळणी, संवाद उपग्रह, उपग्रहांच्या मदतीने दिशा दर्शन अशा विविध विषयांवर परस्पर सहकार्य घेणे शक्य होणार आहे.
  • या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातल्या अवकाश संशोधन संस्थेच्या सदस्यांचा एक संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल.
  • हा कृती गट करारातील तरतुदींच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करेल.
अंमलबजावणी धोरण आणि उदिृष्ट
  • या सामंजस्य करारामुळे संयुक्त कृती गट स्थापन करणे शक्य होईल. हा कृती गट आराखडा तयार करेल.
लाभ
  • या करारामुळे दोन्ही देशातील अवकाश क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल ज्याचा लाभ समाजातल्या सर्व घटकांना आणि मानवतेला होऊ शकेल.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी