Search This Blog

Friday, 2 August 2019

भारत आणि युनायटेड किंगडमच्या(IND-UK) वतीने बेंगळुरूमध्ये “इनोव्हेटिंग फॉर क्लीन एअर”

  • भारत आणि युनायटेड किंगडम यांनी बंगळुरूमध्ये दोन वर्षांचा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे, या उपक्रमाला “इनोव्हेटिंग फॉर क्लीन एअर" असे नाव देण्यात आले आहे. 
  • या उपक्रमांतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार.
  •  यासाठी उपग्रह डेटा, सेन्सर डेटा चा उपयोग केला जाणार आहे.
  • या उपक्रमांतर्गत  हवेची गुणवत्ता सुधारू शकनाऱ्या नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल,याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि कार्यक्षम ग्रीड व्यवस्थापन यांना प्रोत्साहन दिले जाईल.
  • या कार्यक्रमात यू.के. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एनजेन, प्रोजेक्ट लिथियम, इंडियन इंडस्ट्री असोसिएशन, सी 40 शहरे आणि क्लीन एअर प्लॅटफॉर्मचे इतर भागीदार. 
  • यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी बंगलोर, सिटिझन्स फॉर सस्टेनेबिलिटी, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट, शक्ती फाउंडेशन, शेल टेक्नॉलॉजी सेंटर, ग्लोबल बिझिनेस इनरोड्स आणि इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम यांचा समावेश आहे.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी