- अस्वच्छ प्लॅटफॉर्म, सदोष तिकीट मशिन अशी मुंबईतील रेल्वे स्थानकांची ओळख आहे. मात्र ही ओळख चुकीची ठरवत मुंबई सेंट्रल स्थानकाने आदर्श स्थानक असल्याचा मान पटकाविला आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण पूरक तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून; स्थानकाला 'आयएसओ १४००१ : २०१५' या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.
- मुंबई सेंट्रल स्थानकाला मे-२०१९ ते मे-२०२२पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्र धारक स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे.
- मुंबईतील हा मान पटकविणारे हे एकमेव स्थानक आहे.
- विशेष म्हणजे आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्थानकाचा 'पॅटर्न' अन्य तब्बल ३८ स्थानकांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

आयएसओ म्हणजे काय?देशातील एखाद्या सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. सेवेच्या गुणवत्तेची तपासणी करून आयएसओ हे प्रमाणपत्र देते.
आयएसओचे प्रकारआयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापनआयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापनआयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापनआयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन
स्रोत: लोकसत्ता, Maha Times, सकाळ
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी