Search This Blog

Monday, 19 August 2019

‘मराठवाडा जलसंजाल’ योजना

  • मराठवाडय़ाला पाणीपुरवठा करण्यासाठी 11 प्रमुख धरणातून हजारो कि.मीची बंद पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. सोळा हजार कोटींची नवी योजना ‘मराठवाडा जलसंजाल’ नावाने ओळखली जाणार. 
  • मराठवाडय़ातील दुष्काळाची तीव्रता वाढून त्याची वाटचाल वाळवंटीकरणाकडे होत असताना सरकारने या भागासाठी १६ हजार कोटी रुपयांची बंद नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.
  • मराठवाडय़ाला पाणीपुरवठा करण्यासाठी 11 प्रमुख धरणातून हजारो कि.मी ची बंद पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ही धरणे जोडली जाणार आहेत. यात जलशुद्धीकरण प्रकल्प व पंपिंग स्टेशन या सुविधांचा समावेश.
  • मराठवाडय़ातील एकूण ११ प्रमुख धरणे यामुळे जोडली जाणार असून त्यासाठी १.६ मी. ते २.४ मी व्यासाची पाईपलाईन वापरली जाणार आहे.
  • प्राथमिक जाळ्यात अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणातील पाणी फिरवले जाणार आहे. ते कमी पातळीच्या धरणात आणले जाईल. 
  • पाइपलाइन व पंप हाऊस यामुळे हे संजाल हे वीज संजालासारखे काम करील. जास्त पाणी असलेल्या धरणांचे पाणी प्रक्रिया करून नंतर टंचाई असलेल्या तालुक्यांना दिले जाईल. जवळच्या धरणात आणून हे पाणी तालुक्यांना दिले जाणार आहे. ५ कि.मी ते १० कि.मी अंतरात यातील टॅपिंग केले जाईल. मराठवाडा जल संजालास कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणीही मिळणार आहे, जे सध्या अरबी समुद्रात वाहून जाते. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणीही यात समाविष्ट केले जाईल.

इस्रायलची सल्लागार कंपनी
  • इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी यात सल्लागार असून त्यांनी जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्य़ाची इ.स.2050 पर्यंतची पाण्याची गरज निश्चित करून योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.  
  • यात सध्याच्या पाइपलाइन व इतर मुद्दय़ांचा विचार करून अहवाल सादर केला जाणार आहे. 
  • इस्रायलमध्ये पुरेसा पाऊस नसतानाही या कंपनीने गलिली सरोवरातून पाइपलाइनने पाणी उपलब्ध करून दिले आहे.

स्रोत : लोकसत्ता

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी