Search This Blog

Monday, 19 August 2019

सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंच्या यादीत पीव्ही सिंधू 13 व्या स्थानी.


 • भारताची स्टार शटलर पी.व्ही.सिंधू ला फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंच्या यादीत 13 वे स्थान मिळाले आहे.
 • सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंच्या यादीत पीव्ही सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू.
 • सिंधूचे एकूण उत्पन्न 5 दशलक्ष डॉलर्स आहे.
 • या यादीत टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्या स्थानावर आहे.
 • २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या यादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळालं होती. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर होती.
2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 05 महिला खेळाडू :
1) सेरेना विल्यम्स (टेनिस): एकूण कमाई - 29.2 दशलक्ष डॉलर्स.
2) नाओमी ओसाका (टेनिस): एकूण कमाई - .3 24.3 दशलक्ष डॉलर्स.
3) अँजेलिक कर्बर (टेनिस): एकूण कमाई - ११..8 दशलक्ष डॉलर्स.
4) सिमोना हलेप (टेनिस): एकूण कमाई - 10.2 दशलक्ष.
5) स्लोएन स्टीफन्स (टेनिस): एकूण कमाई - .6 ..6 दशलक्ष.

पुसारला वेंकटा सिंधू (पी.व्ही. सिंधू)
 • भारतीय बॅडमिंटनपटू.
 • जन्म : ५ जुलै, १९९५ हैदराबाद. (वय: २४)
 • २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिकस्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले.
 • सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू.
 • आत्तापर्यंत फक्त 2 महिला बॅडमिंटन खेळाडूंनी ऑलिम्पिकपदक जिंकले आहे.या आधी २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल ने कांस्य पदक जिंकले होते.
पुरस्कार : 
 1. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१६)
 2. पद्मश्री (२०१५)
 3. अर्जुन पुरस्कार (२०१३)
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,द हिंदू,विकिपीडिया.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी