Search This Blog

Friday, 2 August 2019

"एक देश-एक रेशन कार्ड" योजना प्रायोगिक तत्वावर सुरू

 • राष्ट्रीय अन्नसुरक्षेला चालना देण्यासाठी भारत सरकारने तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रायोगिक तत्वावर "एक देश - एक रेशन कार्ड" योजना सुरू केली आहे. 
 • 1 ऑगस्ट 2019 पासून ही योजना सुरू झाली.
"एक देश-एक रेशन कार्ड" योजना ONORC
(‘One nation one ration card’ scheme )
 • ज्या कुटुंबांकडे अन्न सुरक्षा कार्डे  आहेत, ते कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात (राशन दुकान) स्वस्त दरात तांदूळ आणि गहू खरेदी करू शकतात. 
 • यासाठी रेशनकार्डला आधार कार्डशी जोडणे बंधनकारक आहे.
 • तेलंगणामध्ये व्हाईट रेशन कार्डधारकांना पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध आहे याद्वारे ते राज्यातील कोणत्याही राशन दुकानातून स्वस्त तांदूळ आणि इतर धान्य खरेदी करू शकतात.
 • तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात "एक देश एक रेशन कार्ड" योजना सुरू केली गेली आहे, आता  दोन्ही राज्ये या पोर्टेबिलिटीच्या सोयीचा फायदा घेऊ शकतात.
 • या पथदर्शी योजनेचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील लोकांना फायदा होणार आहे.
 • केंद्र सरकारने संपूर्ण देशात ऑगस्ट 2020 पर्यंत ही योजना राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
 • गरीब स्थानांतरित लोकांना फायदा होणार.
 • देशातील 77% राशन दुकानांमध्ये POS (POINT OF SALE) बसवलेले आहेत.तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत असलेले  85%  पेक्षा जास्त लोकांचे अन्न सुरक्षा कार्ड आधार शी लिंक केले आहे. 
 • केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री:  रामविलास पासवान 


Source: The Hindu, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी