- NEFT (National Electronic Funds Transfer ) सुविधा डिसेंबर 2019 पासून 24×7 उपलब्ध होईल.
- यापूर्वी एनईएफटी सुविधा केवळ बँकेच्या कार्यकाळात सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध होती.
- यापूर्वी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एनईएफटीने केलेल्या व्यवहारांवरील फीदेखील काढून टाकण्यात आली आहे.
एनईएफटी
- एनईएफटी चे पूर्णरूप नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे आहे.
- या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम ची सुरुवात नोव्हेंबर 2005 मध्ये केली.
- बँकचे ग्राहक एनईएफटीमार्फत एक बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतात.
- एनईएफटी दर अर्ध्या तासाने पैसे हस्तांतरण समायोजित करते.
- 11 जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनईएफटी व्यवहारावर आकारण्यात येणारी फी हटविण्याची घोषणा केली. हा निर्णय 1 जुलै 2019 पासून लागू.
- तत्पूर्वी एनईएफटी व्यवहारांसाठी दहा हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर अडीच रुपये आकारले जात होते तर दहा हजार ते एक लाखापर्यंतच्या व्यवहारांवर पाच रुपये असे नाममात्र शुल्क आकारले जात होते.
स्रोत: Financial Express, The Hindu. The Economic Times.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी