Search This Blog

Monday, 19 August 2019

ज्युनियर ट्रॅक वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक

 • जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे 2019 च्या ज्युनियर ट्रॅक वर्ल्ड सायकलिंग स्पर्धेत भारतीय पुरुष सायकलपटू संघाने टीम स्प्रिंट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
 • या संघात एसो अल्बेन, रोनाल्डो सिंह, जेम्स सिंह आणि रोजित सिंह यांचा समावेश होता.
 • जागतिक सायकलिंग स्पर्धेतील हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.
 • पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 44.764 सेकंद घेतले, तर चीनने 46.248 सेकंदात ही फेरी पूर्ण केली. 
 • भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर ग्रेट ब्रिटनने तिसरे स्थान मिळविले.
 • पुरुष किरीन स्पर्धेत भारताच्या एसो अल्बेनने कांस्यपदक जिंकले.
एसो अल्बने
 • केवळ 18 वर्षे वय असलेला एसो अलबेन अंदमान-निकोबारचा रहिवासी आहे.
 • एसो हा पोर्ट ब्लेयरच्या सरकारी मॉडेल स्कुलचा विद्यार्थी होता.
 • आरंभी त्याची  नौकानयन प्रशिक्षणासाठी निवड झाली पण बुटका असल्याने पुढे त्याला सायकलिंगकडे वळविण्यात आले. 
 • 2015 मध्ये केरळातील राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत 14 वर्षाआतील गटाच्या 500 मीटर टाईम ट्रायलचे रौप्यपदक जिंकून त्याचा यशाचा प्रवास सुरू झाला.
 • तो दिल्ली येथील नॅशनल ऍकॅडमी ऑफ स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे प्रशिक्षण घेत आहे
 • त्याचे वडील अल्बान दिदूस सायकलपटू होते तसेच एसोची आई लेली यासुध्दा राष्ट्रीय स्तराच्या कबड्डीपटू आहेत.
कारकीर्द
 • सायकलिंगच्या ज्युनियर गटाच्या क्रमवारीत तो जगात नंबर वन आहे. 
 • किरीन स्पर्धेतील त्याचे रँकिंग जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • लागोपाठ दुसऱ्या वर्षी भारताला विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत पदक जिंकून दिले आहे. 
 • 2018 ला 16 ऑगस्टला त्याने भारताला सायकलिंगचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून दिले होते. त्यावेळी स्वीत्झर्लंडमधील ऐगल येथे किरीन स्पर्धाप्रकारात तो रौप्य पदक विजेता ठरला होता
 • आता यंदा 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे सायकलींगच्या याच प्रकारात त्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे कास्यपदक जिंकले आहे. 
 • 2018 च्या रौप्यपदकाने त्याला स्प्रिंट सायकलिंगच्या ज्युनियर गटात नंबर वन बनवले होते. हे नंबर वन स्थान त्याने टिकवून ठेवलेले आहे. ● हे सर्वोच्च स्थान गाठणारा तो पहिलाच भारतीय आहे. 
 • 2018 ला त्याचे सुवर्ण पदक फक्त 0.017 सेकंदाच्या फरकाने हुकले होते. त्यावेळी चेक गणराज्याचा याकुब स्टॅस्नी सुवर्ण विजेता ठरला होता. यावेळी एसो तिसऱ्या स्थानी राहिला. 
 • याशिवाय भारतासाठी पहिले विश्व अजिंक्यपद सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या यशातही त्याचे योगदान होते. 
 • 2018 च्या कॉटबसर स्प्रिंट कप, जीपी ब्रनो ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचा तो विजेता ठरला.
 • 2018 च्या आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्याने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर ज्युनियर स्प्रिंटमध्येही तो पहिला आला होता. 
 • मलेशियात झालेल्या 2018 एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत त्याने तीन सुवर्ण पदके जिंकली.
काय आहे सायकलिंगचा किरीन स्पर्धाप्रकार?
 • सायकलिंगमध्ये स्प्रिंट व किरिन हे दोन प्रमुख प्रकार आहे. 
 • किरीनमध्ये सायकलपटूंना  एका स्वयंचलीत वाहनामागे (बहुतेकदा मोटारसायकल) नियंत्रित  वेगाने सायकलिंग करावे लागते. म्हणजे स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत क्रमाक्रमाने वाढत्या वेगाने धावणारे मोटार सायकल किंवा तत्सम वाहन आणि त्याच्यामागे स्पर्धक सायकलपटू अशी ही स्पर्धा असते. 
 • जपानमध्ये या स्पर्धाप्रकाराची सुरुवात झाली. 
 • 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकपासून त्याचा ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला आहे. 
 • त्यात आघाडीचे वाहन याला 'डर्नी' म्हणतात आणि साधारणपणे आठ लॅपची ही स्पर्धा असते. यात डर्नी सहाव्या लॅपपर्यंत क्रमाक्रमाने वेग वाढवत असतो आणि त्यानंतर तो स्पर्धकांच्या मार्गातून बाजूला होता.
 • या शेवटच्या 750 मीटर अंतरातच जो सर्वाधिक वेगाने सायकल पळवून सर्वप्रथम अंतिम  रेषा पार करतो तो विजेता ठरतो. 
 • किरिन साठीच्या सायकली या ब्रेक नसलेल्या फिक्स्ड गिअर सायकली असतात. शर्यत साधारणतः दीड किलोमीटर अंतराची असते. त्यात अडीचशे मीटरच्या ट्रॅकवर सहा लॅप किंवा 400 मीटरच्या ट्रॅकवर चार लॅप किंवा 333 मीटरच्या ट्रॅकवर चार लॅप होतात. 'डर्नी' च्या पाठीमागे सायकलपटूंचा क्रम ठरविण्यासाठी लॉटस् टाकण्यात येतात. पहिल्या तीन लॅपपर्यंत सायकलपटूंना डर्नीच्या मागेच नियंत्रित वेगाने सायकल पळवायची असते. कुणीही डर्नीच्या पुढे जाऊ शकत नाही. 
स्रोत: लोकमत,महाराष्ट्रटाइम्स,इंडिया टुडे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी