
संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक (CWMI) बद्दल
- जल संसाधनांच्या कार्यक्षम व्यवस्थापनात राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन व सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून निति आयोगाने 2018 मध्ये हा निर्देशांक सुरु केला आहे.
- याद्वारे राज्यांमधील सहकार आणि स्पर्धात्मक संघीयतेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- पाणी व्यवस्थापनाच्या विविध परिमाणांचे मोजमाप करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.
- केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश यांच्या भागीदारीत निति आयोगाने जल व्यवस्थापनाबाबत केलेल्या महिती संकलनावरआधारित राज्य / केंद्रशासित प्रदेशांचा क्रमांक ठरवीला जातो.
- राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा क्रमांक 9 घटकांवर आधारित 28 निर्देशकांमधील त्यांच्या कामगीरीवर आधारीत ठरवीला जातो.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी