Search This Blog

Wednesday, 21 August 2019

ब्राझीलमध्ये हवामान बदलासंबंधी 28 वी BASIC मंत्रिमंडळ बैठक

 • ब्राझीलच्या साओ पाउलो येथे हवामान बदलावरील 28 व्या BASIC मंत्रिमंडळाची बैठक झाली.
 • भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. 
 • या बैठकीत बेसिक देशांनी हवामान बदलावर चिंता व्यक्त केली. या देशांनी 2020 पर्यंत विकसित देशांनी विकसनशील देशांना 100 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे.
 • ही बैठक United Nations Framework Convention on Climate Change (UNFCC) Conference of Parties (COP-25) बैठकीपूर्वी  आयोजित करण्यात आली आहे.
 • ही बैठक 2 ते 13 डिसेंबर 2019 ला चिली ची राजधानी सॅंटियागो मध्ये होणार आहे.
BASIC
 • सहभागी देश: ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन.
 • स्थापना:  नोव्हेंबर 2009 . 
 • ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन हे एकत्र 4 देश  जगातील भौगोलिक क्षेत्रापैकी एक तृतीयांश आणि जगातील जवळजवळ 40% लोकसंख्या व्यापते.
 • या देशांनी कोपनहेगन हवामान परिषद वर काम करण्याचे वचन दिले होते. 
 • हा गट उत्सर्जन कमी करण्याचा आणि अन्य देशांनी कोपेनहेगन करारास सहमती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
 • पुढच्या BASIC बैठकीचे यजमानपद चीनकडे असणार आहे.
स्रोत: इंडियन एक्सप्रेस, द हिंदू.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी