Search This Blog

Monday, 19 August 2019

घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक (आधार: 2011-12=100) जुलै 2019 चा आढावा

जुलै 2019 मध्ये घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकात 0.2 टक्के घट होऊन तो 121.2 इतका राहिला. जूनमध्ये तो 121.5 होता.

चलनवाढ
जुलै 2019 मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर 1.08 टक्के राहिला. जून 2019 मध्ये तो 2.02 टक्के तर जुलै 2018 मध्ये 5.27 टक्के होता.

प्रमुख वस्तू गटांचा निर्देशांक 
प्राथमिक वस्तू
या प्रमुख गटाच्या निर्देशांकात 0.5 टक्क्याने वाढ होऊन तो 142.1 इतका राहिला. अन्नधान्य वस्तू गटाचा निर्देशांक 1.3 टक्के वाढून 153.7 इतका झाला. तर बिगर-अन्नधान्य गटाचा निर्देशांक 0.1 टक्के वाढून 128.8 इतका झाला. ‘खनिजे’ गटाचा निर्देशांक 2.9 टक्के कमी होऊन 153.4 इतका राहिला. ‘क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ गटाचा निर्देशांक 6.1 टक्के कमी होऊन 86.9 इतका राहिला.

इंधन आणि वीज
या प्रमुख गटाच्या निर्देशांकात 1.5 टक्के घसरण होऊन तो 100.6 इतका राहिला. ‘वीज’ गटाच्या निर्देशांकात 0.9 टक्के वाढ होऊन तो 108.3 इतका राहिला.

उत्पादिन वस्तू
या प्रमुख गटाच्‍या निर्देशांकात 0.3 टक्क्याने घट होऊन तो 118.1 इतका राहिला.

स्रोत: PIB

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी