Search This Blog

Sunday, 25 August 2019

FATF च्या एशिया पॅसिफिक ग्रुपच्या (APG) गटाने पाकिस्तानला टाकले काळ्या यादीत

 • टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या (APG) गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे.
 • आधीच कर्जाचा डोंगर असलेल्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओढवलेली ही नामुष्की आहे.
 • आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्यासंबंधीचे जे मापदंड आहेत त्यातल्या 40 पैकी 32 निकषांवर पाकिस्ताना अपयशी ठरला आहे. याव्यतिरिक्त, टेरर फंडिंग के सुरक्षा उपायांसाठी 11 पैकी 10 निकष पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
 •  गे वर्षी पाकिस्तानला ग्रे (राखाडी) यादीत टाकण्यात आले होते. ज्यानंतर पाकिस्तानने कृती आराखड्यानुसार काम करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला. त्याचमुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. 
 • आता ऑक्टोबर 2019 पर्यंत पाकिस्तानाला काळ्या यादीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 • APG च्या निर्णयावर जर FATF ने शिक्कामोर्तब केले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था पाकिस्तानला कर्ज देणे पूर्णतः थांबवतील. पाकिस्तानात गुंतवणूक केली जाणार नाही त्यामुळे त्यांच्या उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला देशांतर्गत परिस्थिती सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.
 • APG ची ही वार्षिक बैठक ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये पार पडली. या बैठकीत या संस्थेने टेरर फंडिंग रोखण्यासाठी पाकिस्तानच्या म्युच्युअल इव्हॅल्युएशन अहवालाचे परिक्षण केले. यावेळी पाकिस्तानने टेरर फंडिंग रोखण्यासाठी उचलत असलेल्या पावलांची येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र, या युक्तीवादाने APG चे समाधान झाले नाही.


FATF विषयी 
 • फायनान्शिय ऍक्शन टास्क फोर्स ही एक आंतर सरकारी संस्था आहे. 
 • सदस्य : 411
 • ही  संस्था मनी लान्डरिंग (काळा पैसा वैध करणे) रोखण्यासाठी संबंधित धोरण आखण्याचे काम करते. 
 • 1989 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. 
 • 2001 साली या संस्थेचा क्षेत्रीय विस्तार करण्यात आला आणि दहशतवादाला पुरविल्या जाणाऱ्या निधीविरूद्ध धोरणे बनविण्याचाही त्याच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला. 
 • या संस्थेचे सचिवालय पॅरिसच्या आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या मुख्यालयात आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी