Search This Blog

Saturday, 24 August 2019

‘SARAL’- State Rooftop Solar Attractiveness Index ची उर्जामंत्र्यांकडून सुरुवात

केंद्रीय उर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के. सिंह यांनी नवी दिल्ली येथे आयोजित बैठकीत ‘SARAL’ (State Rooftop Solar Attractiveness Index) सूचकांक सुरू केला.छतांच्या विकासासाच्या आधारे SARAL हा सूचकांक भारतीय राज्यांचे मूल्यांकन करतो. या निर्देशांकात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.या सर्वांना A++ श्रेणी दिली गेली आहे.
तर या निर्देशांकात सर्वात शेवटी जम्मू आणि काश्मीरचा क्रमांक आहे.

SARAL:
  • छतावरील सौर उपयोजन सुलभ करण्याच्या दृष्टीने अवलंबिलेले राज्य-स्तरावरील उपायांचे सर्वसमावेशक मूल्यांकन प्रदान करण्याच्या प्रकारातील हा प्रथम निर्देशांक आहे.
  • या निर्देशांकाची रचना Shakti Sustainable Energy Foundation (SSEF), सह  Chambers of Commerce and Industry of India (ASSOCHAM) आणि Ernst & Young (EY) यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) केली आहे.
  • सरलप्रत्येक राज्यास आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सौर छातासंबंधीचे धोरण सुधारण्यासाठी प्रोत्साहित करते.
  • तसेच हा निर्देशांक राज्यांना गुंतवणूकीकरण करण्यास मदत करेल आणि सौर छप्परांच्या स्थापनेसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करेल.
SARAL चे 5 प्रमुख निर्देशक :
  1. धोरणात्मक आराखडा (Robustness of Policy Framework)
  2. ग्राहकांचा अनुभव (Consumer Experience)
  3. अंमलबजावणीयोग्य वातावरण (Implementation Environment)
  4. व्यवसाययोग्य वातावरण (Business Ecosystem)
  5. गुंतवणूकीचे वातावरण (Investment Climate)
पार्श्वभूमी :
ऊर्जा मंत्रालयाने 2022 पर्यंत 175 GW नवीकरणीय ऊर्जा क्षमता कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यातील 100 GW सौर उर्जा मार्च 2022 पर्यंत चालू होईल. या 100 GW पैकी ग्रीड कनेक्ट सौरमधून 40 GW येणे अपेक्षित आहे. म्हणूनच, हा निर्देशांक सुरू करण्यामुळे राज्यांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण करुन रूफटॉप सौरला उत्तेजन मिळेल आणि सर्व राज्यांना उत्कृष्ट पध्दतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले जाईल. प्रदान करण्याच्या प्रकारातील हा निर्देशांकातील हे पहिले आहे.
स्त्रोत : PIB, The Hindu, GKToday, लोकसत्ता

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी