Search This Blog

Friday, 2 August 2019

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता नवी प्रणाली: AMBIS

AMBIS : AUTOMATED MULTIMODAL BIOMETRIC IDENTIFICATION SYSTEM.


 • गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता पोलीस नव्या ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीची मदत घेणार आहेत.
 • देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे 'महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार' आहे.
 • सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीमध्ये उपलब्ध आहे.
 • 'अॅम्बिस' प्रमालीच्या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठविण्यासाठी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणार तसेच त्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मदत मिळणार आहे.


 • पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
 • 'ॲम्बिस' प्रणाली देशातील पहिली प्रणाली असून गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार आहे.
 • मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. सुमारे 200 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 • या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसेच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेस शी जोडलेली असणार आहे.
 • 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा, तसेच 2600 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • एका क्लिकवर आरोपींची सर्व माहिती मिळणार असून फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाईल स्कॅनरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या प्रणालीला सी.सी.टी.एन.एस आणि सीसीटीव्हीशी जोडण्यात येणार असून 1435 चान्सप्रिंट्स प्रणाली मध्ये उपलब्ध असणार आहेत.
 • (CCTNS : Crime and Criminal Tracking Networks and Systems.)


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी