Search This Blog

Monday, 19 August 2019

नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आयोजित

 • "शिक्षकाच्या शिक्षणाचा प्रवास: स्थानिक ते जागतिक" (Journey of Teacher Education: Local to Global’)या शीर्षकाखाली नवी दिल्ली येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. 
 • या परिषदेचे उद्घाटन मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झाले. 
 • नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई) च्या वतीने हे दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होते.
 • वैधानिक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.
 • या परिषदेचे उद्दीष्ट म्हणजे भारताची शालेय शिक्षण प्रणाली जागतिक स्तराच्या बरोबरीने  आणणे.
 • या परिषदेच्या माध्यमातून शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत आणि प्रशासक यांना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. 
 • या परिषदेत भारत आणि परदेशातील 40 तज्ज्ञ सहभागी झाले होते.
महत्त्वाचे
 • 22 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय जगातील सर्वात मोठा शिक्षक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम "निष्ठा" ( National Initiative on School Teachers Head Holistic Advancement) सुरूवात करणार आहे. 
 • यात 42 लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.
 • सध्या भारतामध्ये 8.5 दशलक्ष शिक्षक आहेत ज्यांची संख्या युरोप मधील काही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.त्यामुळे या संसाधनांकडे आत्यंतिक लक्ष देणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (National Council for Teacher Education) 
 • ही केंद्र सरकारची वैधानिक संस्था आहे.
 • कायदा : नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ऍक्ट -1993
 • स्थापना : 17 ऑगस्ट 1995
 • मुख्यालय : नवी दिल्ली.
 • ब्रीदवाक्य: गुरुर्गुरुतमो धाम
 • अध्यक्ष: डॉ सतबीर बेदी
मुख्य कार्य : 
 • भारतीय शिक्षण प्रणालीचे मानक आणि कार्यपद्धती चे अवलोकन करणे. 
 • शिक्षकांच्या शिक्षणाच्या विकासासाठी योजना आखणे. 
 • 1973 पासून नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ही तिच्या आधीच्या दर्जा नुसार शिक्षक व शिक्षणाशी संबंधित सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकारची सल्लागार संस्था होती. 
 • शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद काम करूनही, शिक्षकांच्या शिक्षणाच्या दर्जांची देखभाल करणे आणि दर्जा नसलेल्या शिक्षक शिक्षण संस्थांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक नियामक कामे करणे त्यांना शक्य झाले नाही.
 • शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण (एनपीई)-1986 आणि त्याअंतर्गत कृती कार्यक्रमात शिक्षकांच्या शिक्षणाची व्यवस्था दुरुस्त करण्याचे पहिले चरण म्हणून वैधानिक दर्जा आणि आवश्यक संसाधनांसह राष्ट्रीय शिक्षक शिक्षणाची परिषद बनविली गेली.
 • सध्या भारतातील शिक्षक शिक्षण संस्था, संभाव्य शालेय शिक्षकांसाठी एनसीटीई द्वारा मान्यता प्राप्त 17 शिक्षक शिक्षण कार्यक्रम राबवतात.
स्रोत: NCTE.GOV.IN (an official website of ncte), INDIA TODAY

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी