Search This Blog

Wednesday, 21 August 2019

निधनवार्ता : मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी

 • ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी यांचं  नुकतच निधन झालं. ते ९२ वर्षाचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे खय्याम यांना सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 
 • खय्याम यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात अविभक्त पंजाबमधील राहोन (जि. जालंधर) येथे १८ फेब्रुवारी १९२७ मध्ये झाला. 
 • यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. 
 • आपल्या संगीत क्षेत्रातील करीयरची सुरुवात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लुधियाना येथे १९४३ च्या सुमारास केली.
 • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खय्याम यांनी अगदी थोडा काळ लष्करातही सेवा बजावली. 
 • त्यानंतर ते मुंबईला आले व पुढील काळात शर्माजी-वर्माजी या पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त संगीतकारांच्या ते सान्निध्यात आले.१९४८ च्या सुमारास खय्याम यांनी लोकप्रिय चित्रपट 'हीर रांझा'साठी संगीत दिग्दर्शन केले. या जोडीतील रोहनलाल वर्मा पुढील काळात पाकिस्तानात गेले आणि खय्याम यांची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. 
 • १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. 
 • ‘बिवीहा’ त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. त्यातील ‘अकेले मे वो घबराते होंगे’ हे गाणे महंमद रफी यांनी गायले होते. 
 • ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने खय्याम यांना संगीतकार म्हणून खरी ओळख मिळवून दिली. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हे मुकेश यांच्या आवाजातील गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. 
 • त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट ‘मनजून’ प्रदर्शित झाला नाही.
 • वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी म्हणजे १० कोटी रुपयांची संपत्ती दान केली होती.पुलवामा झाल्यावर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केले होते. 
पुरस्कार 
 • 1977: Filmfare Best Music Director Award (‘कभी कभी’ चित्रपटासाठी)
 • 1982: Filmfare Best Music Director Award (‘उमराव जान’ चित्रपटासाठी)
 • 1982: National Film Award for Best Music Direction (‘उमराव जान’ चित्रपटासाठी)
 • 2007: Sangeet Natak Akademi Award: Creative Music
 • 2010: Filmfare Lifetime Achievement Award
 • 2011: Padma Bhushan
 • 2018: Hridaynath Mangeshkar Award
गाजलेले सिनेमा 
 • फिर सुबह होगी (१९५८) 
 • शोला और शबनम (१९६१) 
 • आखिरी खत (१९६६) 
 • कभी कभी (१९७६) 
 • त्रिशूल (१९७८) 
 • नूरी (१९७९) 
 • थोडीसी बेवफाई (१९८०) 
 • दर्दे और आहिस्ता आहिस्ता (१९८२) 
 • रझिया सुलतान (१९८३) 
 • उमराव जान 
 • पर्बत के उसपार 
 • थोडीसी बेवफाई 
 • बाजार 
 • हीर रांझा 
'खय्याम' यांची गाजलेली काही खास गाणी 
 • कभी कभी मेरे दिल में... 
 • इन आंखों की मस्ती के दीवाने हजारों है 
 • आजा रे ओ मेरे दिलबर आजा...
 • मैं हर एक पल का शायर हूँ...
 • वो सुबह कभी तो आएगी...
 • जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें 
 • बुझा दिए हैं खुद अपने हाथों 
 • ठहरिए होश में आ लूं 
 • तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो 
 • शामे गम की कसम 
 • बहारों मेरा जीवन भी संवारो 
 • जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने 
 • दिखाई दिए यूँ 
 • दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए 
 • परबतों के पेडोंपर श्यामका बसेरा 
 • मै पल दो पल का शायर हूँ 
 • ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है 
 • हैं कली कली के लब पर 
 • गपुची गपुची गम गम 
 • परबतों के पेडेपर श्याम का बसेरा 
स्रोत: लोकसत्ता,  The Hindu, Wiki

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी