- 'एम्पोवर्ड एक्स्पर्ट कमिटी' च्या म्हणण्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) इंस्टीट्युट ऑफ एमिनेन्स साठी 20 संस्थांची शिफारस केली आहे. या समितीचे अध्यक्ष एन. गोपालस्वामी होते.
- आयआयटी मद्रास, आयआयटी खडगपूर, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, अमृता विद्या विद्यापीठम आणि व्हीआयटी संस्थांसारख्या 20 संस्था या मध्ये आहेत.
उद्दीष्ट :
- जागतिक स्तरावरील 20 संस्था विकसित करणे
- जागतिक शिक्षणाच्या नकाशावर भारताचे नाव कोरणे.
- फीस, कोर्सचा कालावधी इत्यादींसाठी संस्थेला अधिक स्वायत्तता दिली जाईल.
- सार्वजनिक संस्थांना 1000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार, परंतु खासगी संस्थांना कोणत्याही प्रकारचे निधी दिले जाणार नाही.
Empowered Expert Committee
- श्री एन गोपालस्वामी (अध्यक्ष) - माजी मुख्य निवडणूक आयुक्त (ईईसी)
- प्राध्यापक तरुण खन्ना (सदस्य) - हार्वर्ड विद्यापीठातील दक्षिण आशिया संस्थेचे संचालक
- कु. रेणु खट्टोर (सदस्य) -ह्युस्टन युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंट
- श्री प्रीतम सिंह (सदस्य) - आयआयएम लखनऊचे माजी संचालक
- इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स साठी 10 सरकारी आणि 10 खासगी शैक्षणिक संस्था निवडण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले होते.
- या समितीकडे एकूण 114 अर्ज आले होते.
स्रोत: PIB,THE HINDU,THE TIMES OF INDIA.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी