Search This Blog

Tuesday, 27 August 2019

तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 जाहीर

 • तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आले असून, या पुरस्काराचे भू, जल, वायु साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते. 
 • हा पुरस्कार दरवर्षी ऑगस्टमध्ये देण्यात येतो.
 • वांगचूक शेर्पा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात राजू कोळी यांच्यासह गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, माणिकंदन के आणि हवाई साहसपटू रामेश्वर जांग्रा यांचा समावेश आहे.
 • यावर्षी सचिव (युवा व्यवहार) यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय निवड समिती स्थापन केली गेली. 
 • या समितीमध्ये साहस क्षेत्रातील तज्ञ सदस्य होते.
 • राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 ला होणाऱ्या कार्यक्रमात इतर क्रीडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतीं श्री राम नाथ कोविंद यांच्या  हस्ते प्रदान करण्यात येतील. 
 • मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
समितीच्या शिफारशी व योग्य तपासणीनंतर सरकारने खालील व्यक्तींना हे पुरस्कार देण्याचे ठरविले आहेः
 1. श्रीमती अपर्णा कुमार -जमिनीवरील साहस
 2. कै.श्री दिपंकर घोष -जमिनीवरील साहस
 3. श्री माणिकंदन के. - जमिनीवरील साहस
 4. श्री प्रभात राजू कोळी -पाण्यातील साहसी
 5. श्री रामेश्वर जांग्रा -हवाई साहस
 6. श्री वांगचुक शेर्पा -आजीवन कामगिरी

तेन्झिंग नॉर्गे
 • तेन्झिंग नॉर्गे हे एक नेपाळी गिर्यारोहक होते.
 • 29 मे 1953 रोजी न्यूझीलंडच्या सर एडमंड हिलरी यांच्यासोबत त्यांनी प्रथम एव्हरेस्ट पर्वत सर केला होता.
 • जन्म: 29 मे 1914
 • मृत्यू: 9 मे 1986
 • आत्मचरित्र: Man of Everest
 • 1959 मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण.
 • टाइम्स मॅगझीन ने त्यांचा समावेश 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये केला आहे.

स्रोत: PIB, The Hindu, Wikipedia.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी