Search This Blog

Wednesday, 21 August 2019

ओकजोकुल हिमनदीचा अंत्यसंस्कार

आइसलँडमध्ये हवामानातील बदलामुळे मृत पावलेली पहिली हिमनदी "ओकजोकुल" ( Okjokull ) च्या
"अंत्यसंस्काराचे" आयोजन केले गेले. इसलँडचे पंतप्रधान कॅटरिन जेकब्सडॉटीर (Katrin Jakobsdottir) तसेच संयुक्त राष्ट्राचे माजी मानवाधिकार उच्चायुक्त मेरी रॉबिन्सन सुद्धा या ‘अंत्यसंस्कार’ मध्ये सहभागी झाले होते..

"ओकजोकुल" हिमनदी (Okjokull glacier)
  • आईसलँडचा 11%भूभाग हिमानद्यांनी व्यापलेला आहे.
  • गेल्या 700 वर्षांपासून "ओकजोकुल" हिमनदी  अस्तित्त्वात आहे, ही हिमनदी 2014 मध्ये मृत घोषित करण्यात आली. 
  • ही हिमनदी जवळपास 15 चौरस मैल पसरलेली होती.तिचे रूपांतर नंतर एक तलावात झाले.
  • अंत्यसंस्कारात सहभागी झालेले लोक राजधानी रिकिविकच्या ईशान्य दिशेला असलेल्या ज्वालामुखीवर गेले आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
  • या प्रक्रियेदरम्यान एका खडकावर एक पितळी फळी बसविली गेली. फळीवर "भविष्यासाठी पत्र " आणि "415 ppm CO2" लिहले आहे.
  • गेल्या मे महिन्यात वातावरणात मोजलेले कार्बन डाय ऑक्साईडचे विक्रमी प्रमाण 415 ppm होते.
  • ओकजोकुल" हिमनदी आयसलँडमधील पहिली हिमनदी आहे जीचा हिमनदीचा दर्जा रद्द केला गेला आहे. 
महत्वाचे मुद्दे
  • इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) ने एप्रिलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन सध्याच्या दराने चालू राहिल्यास 2100 पर्यंत जगातील वारसा स्थळाच्या जवळपास अर्ध्या  हिमनद्या संपुष्टात येतील.
  • बहुतेक देशांच्या मोठ्या हिमनदांची पुढील 200 वर्षांत अशीच स्थिती असेल अशी अपेक्षा आहे.
  • आइसलँडमध्ये दरवर्षी 11 अब्ज टन बर्फ संपुष्टात येत आहे आणि वैज्ञानिकांनी असा विश्वास आहे की 2200 पर्यंत आइसलँडच्या सर्व 400 पेक्षा जास्त हिमनद्या नष्ट होतील.
स्रोत : BBC INDIA TODAY,

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी