Search This Blog

Wednesday, 7 August 2019

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

 • भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील एम्सरुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टमुळे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. 
 • प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.
 • काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे त्यांचे ट्वीट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते,’ असे नमूद केले होते.
 • वॉशिंग्टन पोस्टने भारतीय राजकारणातली सुपरमॉमअसा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख.
 • समाजमाध्यमावर अत्यंत सक्रीय आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्वराज यांनी परदेशात मदतीसाठी अडकलेल्या अनेक नागरिकांना केवळ एका ट्विटवरुन परराष्ट्रमंत्री या नात्याने मदत केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही त्या अत्यंत लोकप्रिय होत्या.
 • त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं.
 • त्या सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या.
 • १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या.
 • त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली.
 • मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
 • सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला.संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली.
 • सोळाव्या लोकसभेत त्या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
महत्वाचे :
 • सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी पंजाबच्या अंबाला येथे झाला.
 • त्यांनी सनातन धर्म महाविद्यालयातून शिक्षण घेतले.
 • त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
 • त्या 13 मे 2009 पासून 24 मे 2019 पर्यंत लोकसभेच्या खासदार होत्या.
 • 13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 पर्यंत ती दिल्लीची पाचव्या मुख्यमंत्रीही होत्या.
 • 30 सप्टेंबर 2000 ते 29 जानेवारी 2003 पर्यंत त्या देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या.
 • 29 जानेवारी 2003 ते 22 मे 2004 या काळात ते संसदीय कामकाज मंत्री होत्या.
 • 26 मे 2014 ते 30 मे 2019 पर्यंत त्या परराष्ट्र मंत्री राहिल्या.
 • चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या.
 • त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या,
 • तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.
 • देशाचे परराष्ट्र मंत्रीपद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज या इंदिरा गांधी नंतर दुसऱ्या महिला नेत्या आहेत.

स्रोत: द हिंदू ,द टाइम्स ऑफ इंडिया,लोकसत्ता, लोकमत ,सकाळ..

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी