- प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझव्र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर विठ्ठल गोकर्ण (वय 60 वर्ष )यांचे मंगळवारी वॉिशग्टन डीसी येथे निधन झाले.
- नोव्हेंबर २०१५ मध्ये गोकर्ण यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर कार्यकारी संचालक आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली होती. त्याआधी नोव्हेंबर २००९ ते डिसेंबर २०१२ दरम्यान ते रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. ते त्या वेळी सर्वात कमी वयात नेमणूक झालेले डेप्युटी गव्हर्नर होते.
- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली होती. केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्रात स्नातकोत्तर पदवी मिळविली होती.
- रिझव्र्ह बँकेत दाखल होण्याआधी ते क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक होते. स्टँडर्ड अँड पुअर्स, एनसीएईआर तसेच इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत त्यांनी व्याख्याता म्हणून काम केले होते.
Friday, 2 August 2019
रिझव्र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे निधन
August 02, 2019
No comments
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी