Search This Blog

Friday, 2 August 2019

हायपरलुप प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजूरी

  • मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच, डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
  • या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त २३ मिनिटांचा होणार आहे.
  • मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञान वर जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे.
  • हा प्रकल्प मुंबई-पुणेदरम्यान (बीकेसी ते वाकड) ११७.५० कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. 
  • सुमारे ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
  • पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार
  • आहे. 
  • संपूर्ण प्रकल्प ६ ते ७ वर्षात पूर्ण होणार आहे.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी