Search This Blog

Monday, 19 August 2019

आज प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न

  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
प्रणव मुखर्जी
  • प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.
  • मुखर्जी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
  • ते 1982 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.
  • पंतप्रधानां व्यतिरिक्त ,आठ वर्षे लोकसभेचे सभागृह नेते राहिलेले ते एकमेव व्यक्ती.
  • भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सहावे राष्ट्रपती आहेत. याआधी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन,व्हीव्ही गिरी आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.
  • पद्मविभूषण:2008
  • त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.
नानाजी देशमुख
  • हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.
  • नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.
  • नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.
  • राज्यसभेचे सदस्यही होते.
  • 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले
  • त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • 27 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
भूपेन हजारिका
  • त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसामच्या साडिया येथे झाला.
  • भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून कार्य केले.
  • आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.
  • हजारीका यांना खलील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार : 1987
  • दादासाहेब फाळके पुरस्कार : 1992
  • पद्मश्री : 1977
  • पद्मभूषण : 2001
  • पद्मविभूषण : 2012 (मरणोत्तर).
  • ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते.
  • 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून गुवाहाटीत उभे राहिले परंतु निवडून येऊ शकले नाही.
  • 5 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.
भारत रत्न पुरस्कार
  • सुरुवात: 1954
  • राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कारची  शिफारस पंतप्रधान करतात.
  • पुरस्काराच्या एक बाजूला पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा शब्द तर एक बाजूला भारताचे राजचिन्ह असते.
  • हा पुरस्कार रोख स्वरूपात देत नाहीत..'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.
  • भारतरत्न पुरस्काराने आजवर 48 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.
  • यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • आत्तापर्यंत हजारिका आणि देशमुख यांच्यासह 14 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.
  • सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.
  • सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा पुरस्कार देतात.
  • 2014 मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले
प्रथम पुरस्कारविजेते (1954): 
1) सर्वपल्ली राधाकृष्णन
2) चक्रवर्ती राजगोपालचारी
3) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,नवभारत टाइम्स ,The Hindu, PTI.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी