Search This Blog

Friday, 2 August 2019

भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार


  • म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद यसो नाईक यांनी इयांग यांची भेट घेतली.
  • दोन्ही देशातली संरक्षण सहकार्य वाढवणे, संयुक्त सराव तसेच म्यानमारच्या संरक्षण दलांना प्रशिक्षण देणे आणि संयुक्त टेहळणीतून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणे या विषयांवर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य विषयक सामंजस्य करार करण्यात आला.

[Source: PIB Gov of India ]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी