Search This Blog

Sunday, 25 August 2019

पी.व्ही. सिंधू चे स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक

 • रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकावरील जपानच्या नोझोमी ओकुहाराला अवघ्या 37 मिनिटांत सरळ सेटमध्ये 21-7 , 21-7 ने पराभूत करून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
 • यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती.
 • स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
 • सिंधूने उपात्यपूर्व फेरीत शनिवारी चीनच्या चेन यू फेईला हरवले होते.
 • जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • या सामन्यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील जय पराजयाची आकडेवारी ही 8-7 अशी होती.
 • तसेच या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची ओकुहारा परतफेडही केली.
 • यापूर्वी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडून कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते भारतीय : 
 • 1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
 • 2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक
 • 2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
 • 2014 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
 • 2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक
 • 2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
 • 2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक
 • 2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
 • 2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
पी व्ही सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा :
 • भारताने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आतापर्यंत 3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई केली आहे.
 • त्यात प्रत्येकी दोन रौप्य व दोन कांस्य ही सिंधूने जिंकलेली आहेत.
 • सिंधूने 2013 व 2014 मध्ये कांस्यपदक जिकंले
 • 2017 व 2018 मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले
 • सिंधूचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हे पाचवे पदक आहे.
पुसारला वेंकटा सिंधू (पी.व्ही. सिंधू)
 • भारतीय बॅडमिंटनपटू.
 • जन्म : 5 जुलै, 1995 हैदराबाद. (वय: 24)
 • 2016 सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिकस्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले.
 • सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू.
 • आत्तापर्यंत फक्त 2 महिला बॅडमिंटन खेळाडूंनी ऑलिम्पिकपदक जिंकले आहे.या आधी 2012 लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल ने कांस्य पदक जिंकले होते.
पुरस्कार :
 • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2016)
 • पद्मश्री (2015)
 • अर्जुन पुरस्कार (2013)
स्रोत: लोकसत्ता,लोकमत ,महाराष्ट्र टाइम्स,द हिंदू.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी