- जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या 2967 पर्यंत पोहोचली आहे.
- संरक्षित वन क्षेत्रात वाढ झाली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 साली 692 संरक्षित वन क्षेत्रं होती. आज 2019 पर्यंत त्यांची संख्या 860 इतकी झाली आहे. त्याशिवाय सामुदायिक संरक्षित वनं क्षेत्रांची संख्या 2014 मध्ये 43 इतकी होती. ती आता 100 च्या पुढे गेली आहे.
- भारतात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. व्याघ्र गणनेची तीन आवर्तने 2006, 2010 आणि 2014 मधे पूर्ण झाली आहेत.
अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018
- नुकताच अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल 2018 प्रसिद्ध करण्यात आला, या अहवालानुसार देशात 2967 वाघ आहेत.
- हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक व्याघ्र दिन (29 जुलै) रोजी जाहीर केला.
- मध्य प्रदेश 526,
- कर्नाटक 524,
- उत्तराखंड 442,
- महाराष्ट्र 312
- तामिळनाडू 264.
- केवळ छत्तीसगड आणि मिझोरममध्ये वाघांची संख्या कमी झाली आहे.
- मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघ आढळले आहेत.
- 2014 नंतर सर्वाधिक वाघांची संख्या 'तामिळनाडूमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पात' वाढली आहे.
- 2006 नंतर दर चार वर्षांनी आयोजित केलेली वाघांची ही चौथी गणना आहे.
- या सर्वेक्षणात वन अधिकाऱ्यांनी 3,81,400 चौरस किलोमीटर क्षेत्र कव्हर केले. यासाठी 26,760 कॅमेरा सापळे बसविण्यात आले.
[Source: PIB Gov of India ]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी