Search This Blog

Thursday, 6 September 2018

समलैंगिक संबंध कायदेशीर

Section 377 : समलैंगिकता म्हणजे आहे तरी काय?

समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. समलैंगिक असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलैंगिक संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. परंतु, समलैंगिकता म्हणजे नेमके काय? याबाबातची माहिती जाणून घेऊयात...


समलैंगिक संबंध म्हणजे काय?

समलिंगी (होमो सेक्शुअल) ही नैसर्गिक अवस्था आहे. साधारणतः 7 ते 14 या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू लागते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असते असे नाही. पण, आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. पुढे त्यांच्याशीच घट्टमुट्ट मैत्री होऊ लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असते. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटते ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच! पुढे काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही.

गे आणि लेस्बियन म्हणजे काय?

पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणे व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटले जाते. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटले जाते. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचेच आकर्षण वाटते. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

समलैंगिक हे अनैसर्गिक आहे का?

समलैंगिक असणे नैसर्गिक आहे. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावेसे वाटते याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

समलैंगिकता ही विकृती किंवा आजार आहे का?

समलैंगिकतेकडे कल असणे ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. पुरुषाला जसे स्त्रीचे आकर्षण वाटणे, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणे, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला-स्त्रीचं, पुरुषाला-पुरुषाचं आकर्षण वाटू शकते. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल वाढतो. समलिंगी संबंध ठेवणारे अनेकजण समाजात आहेत.

समलैंगिक संबंध ठेवण्यामागची कारणे?

पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जे समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असते. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी हे समलिंगी संबंधांचा आधार घेतात.

समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे?

मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींला जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय दंडसहिता कलम 377 नुसार समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली आहे.

[Source : Sakal]
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी