Search This Blog

Friday, 7 September 2018

हिमा दासचं गुवाहटी विमानतळावर अनोखं स्वागत


  • इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये ३ पदकांची कमाई करणाऱ्या हिमा दासचं, गुवाहटी विमानतळावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. हिमाच्या स्वागतासाठी विमातळावीरल कार्पेटला रनिंग ट्रॅकचं स्वरुप देण्यात आलं होतं. 
  • आशियाई खेळांमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर हिमा पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे.
  • आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमा दासचं विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं.
  • २०१८ हे साल हिमा दाससाठी चांगलं गेलं आहे. सर्वात प्रथण IAAF World Championship U-20 स्पर्धेत हिमा दासने सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई खेळांमध्ये हिमा दासने मिश्र रिले स्पर्धेत रौप्य, महिला रिले स्पर्धेत सुवर्ण तर वैय्यक्तिक प्रकारातही रौप्य पदकाची कमाई केली होती.


[संदर्भ : लोकसत्ता ; 08 सप्टेबर 2018]
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी