Search This Blog

Friday, 7 September 2018

गुजराती साहित्यिक भगवतीकुमार शर्मा यांचे निधन


  • त्यांचे शालेय शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत झाले. त्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली, अर्थात नंतरच्या काळात म्हणजे १९६८ मध्ये त्यांनी गुजराती व इंग्रजी भाषेत पदवी घेतली. 
  • महात्मा गांधी यांच्या निधनावेळी लिहिलेल्या कवितेनंतर त्यांनी १९५२ मध्ये जी दोन सुनीत काव्ये लिहिली होती, ती ‘गुजरातमित्र’ या सुरतमधील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. 
  • गुजराती साहित्य परिषदेचे ते २००९ ते २०११ या काळात अध्यक्ष होते. कादंबरी, लघुकथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन केले. 
  • त्यांच्या ‘असूर्यलोक’ या पुस्तकाला १९८७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी सुमारे ८० हून अधिक पुस्तके लिहिली. 
  • त्यांच्या निवडक कथा ‘भगवतीकुमारनी श्रेष्ठ वार्ता ’(१९८७) नावाने प्रसिद्ध आहेत. 
  • त्यांनी ‘अमेरिका आवजे’(१९९६) हे प्रवासवर्णनही लिहिले. 
  • ‘संभव’ हा त्यांचा पहिला गझलसंग्रह तर ‘छांदो छे पनदादा जेनान’, ‘झलहल’, ‘आधी अक्षरनु चोमासु’, ‘उजागरो’, एक कागल हरिवरणे, गझलयान हे त्यांचे काव्यसंग्रह. 
  • ‘सरल शास्त्रीजी’ हे जीवनचरित्र त्यांनी लिहिले. 
  • सुरतवर त्यांचे विशेष प्रेम होते, ‘सुरत मुज घायल भूमी’ हे त्यांचे आत्मचरित्र त्याचीच साक्ष देते. 


पुस्तके :
‘आरती आने अंगारा ’(१९५७), ‘मन नहीं माने’ (१९६२), ‘रिक्त’ (१९६८),‘ व्यक्तमध्य’ (१९७०),‘ समयद्वीप’(१९७४), ‘ऊध्र्वमूल’ (१९८१), ‘असूर्यलोक’ (१९८७), ‘द्वार नही खुले’, ‘प्रेमयात्रा’, ‘विती जसे आ रात..’, ‘पडछाया संगीत ’(१९६३), ‘ना किनारो ना मझधार’(१९६५), ‘हृदयशरण निर्विकल्प’ (२००६).

लघुकथासंग्रह :
‘दीप से दीप जले ’(१९५९), ‘हृदयदान ’(१९६०), ‘रातराणी’, ‘छिन्नभिन्न’ (१९६७), ‘महेक माली गई तुमने फूल दिधानु याद नथी’ (१९७०), ‘कई याद नथी’ (१९७४), ‘व्यर्थ कक्को’, ‘छाल बाराखडी’ (१९७९), ‘अकथ्य’ (१९९४), ‘मांगल्य कथाओ’ (२००१), ‘अडबीद’ (१९८७)

पुरस्कार :
कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, साहित्य अकादमी पुरस्कार, डी. लिट, कलापी पुरस्कार, हिरद्र दवे स्मृती पुरस्कार, नचिकेत पुरस्कार, गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार
[संदर्भ : लोकसत्ता ; 08 सप्टेबर 2018]
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी