Search This Blog

Thursday, 6 September 2018

हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन

  • हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. 
  • डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. 
  • १९९७ मध्ये बुगी नाइट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. 
  • इव्हिनिंग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’या सिनेमासह इतर काही सिनेमांमध्ये ते आत्ताही काम करत होते.
  • अँजल बेबी हा १९६१ मध्ये आलेला त्यांचा पहिला सिनेमा होता.
  • ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या सिनेमांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले.
  • त्यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र एक अमेरिकन अभिनेता कधीही जेम्स बॉन्ड साकारू शकत नाही असे म्हणत त्यांनी ती नाकारली.
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी