- ऋतभ्रता मुन्शी याना यंदाचा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मुन्शी यांना हा पुरस्कार त्यांच्या नंबर थिअरीवरील संशोधनासाठी देण्यात आला आहे.
- अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी घेतली. नंतर डॉक्टरेटनंतरचे प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतले.
- सध्या ते कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेत कार्यरत आहेत.
- २०१७ मध्ये त्यांना इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचा गणित विज्ञानाचा पुरस्कार मिळाला होता, तर २०१३ मध्ये बिर्ला सायन्स प्राइझ, २०१५ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटचे सुवर्णपदक असे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.

रामानुजन पुरस्कार
- ‘दी इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स’ या संस्थेकडून रामानुजन पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशांतील ४५ वयाखालील संशोधक गणितज्ञांची निवड त्यासाठी केली जाते.
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी