Search This Blog
September 05, 2018
- डॉ आरिफ अलवी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
- यासोबत ज्यांचे पूर्वज भारतीय होते असे पाकिस्तानचे ते तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.
- याआधीचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन यांचे पूर्वजदेखील भारतात होते. हुसैन यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आग्रा येथे वास्तव्यास होतं.
- माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं कुटुंब भारतातून स्थलांतरित झालं होतं. मुशर्रफ यांचं कुटुंब फाळणीआधी दिल्लीत वास्तव्यास होतं.
- डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी