Search This Blog

Monday, 9 April 2018

खासदारकीचं वेतन आणि इतर भत्ते मिळून मिळणारा सर्व निधी सचिनकडून पंतप्रधान कार्यालयाला दानसहा वर्षांच्या कालावधीत खासदारकीचं वेतन आणि इतर भत्ते मिळून मिळणारा सर्व निधी सचिनने पंतप्रधान कार्यालयाला दान केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने पगार आणि भत्त्यांमधून मिळालेली अंदाजे ९० लाखांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीला दिलेली आहे.

सचिन तेंडुलकरच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सचिनने सहा वर्षांच्या कालावधीत खासदार या नात्याने १८५ प्रकल्पांना सहकार्य केलं आहे. मंजूर केलेल्या ३० कोटींच्या निधीपैकी सचिनने १८५ प्रकल्पांसाठी ७.४ कोटीचा निधी प्रकल्पांसाठी दिला. तर उर्वरित निधी सचिनने देशभरात शैक्षणिक, बांधकाम, शाळांचं आधुनिकीकरण यांच्यासाठी दिला आहे. याचसोबत प्रधानमंत्री आदर्श ग्रामसडक योजनेअंतर्गत सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टम राजू कोंड्रीगे आणि महाराष्ट्रातील डोंजे ही गावं दत्तक घेतली आहेत.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी