
सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.
"ऑर्टिफिशियल इंटलिजन्स'च्या माध्यमातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
भावी प्रकल्प
- नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी यंत्रणा
- पुणे - मुंबई महामार्गावरही अशी यंत्रणा
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी