Search This Blog

Monday, 9 April 2018

काळवीट शिकार प्रकरण

Blackbuck Poaching Case काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यास सलमान खानला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते. मात्र, सलमानसह अन्य आरोपींनाही तिच शिक्षा दिली जाईल, असे वकिलांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सलमानसह सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना देखील सहा वर्षांची शिक्षा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी काळवीटची शिकार केली होती. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर सलमान या प्रकरणात दोषी आढळला तर उर्वरित आरोपी देखील दोषी ठरु शकतात. त्या सर्वांना समान शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे वकिलांनी सांगितले.

काळवीट शिकार प्रकरण नेमके आहे तरी काय

वीस वर्षांपूर्वी दोन काळवीटांची शिकार केल्याच्या प्रकरणात जोधपूरचे न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. सलमान खानसह सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही आज निकाल लागणार आहे. मात्र, या सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे हे काळवीट शिकार प्रकरण नेमके आहे तरी काय याचा घेतलेला हा आढावा…

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. शिकारीच्या वेळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे तिथे उपस्थित होते.

शिकार सलमाननेच केली
त्या रात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी