
कोकण किनापट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी उभारल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात सुमारे चार कोटींच्या अद्ययावत कुटी उभारण्यात आल्या आहेत. एका कुटीला सुमारे दहा लाखांचा खर्च आला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात चोर वाटेने येणाऱ्या वृक्षतोड तस्करांसह श्वापदांच्या शिकारीही थांबण्यास मदत होणार आहे. कोकण किनार पट्टीवर गावातून येणाऱ्या पायवाटा अन् चोरट्या वाटांवर संरक्षक कुटी आहेत. त्यामुळे तेथील सगळ्या हालचालीवरही वन्यजीव विभागाची करडी नजर असणार आहे. तेथे चोवीस तास वन्य जीव विभागाचा कर्मचारी निवासी असणार आहे. रात्रीची गस्त घालण्यासह त्यांच्याकडे जीपीआरएस व अन्य अत्याधुनिक सुविधाही असणार आहेत.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी