इटलीमध्ये एकाचवेळी १३७२ ह्य़ुमनॉइड यंत्रमानवांनी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली असून त्यामुळे चीनमधील विक्रम मोडला गेला आहे. २०१६ पासून तंत्रज्ञान कंपन्या नर्तक रोबोटसची निर्मिती करीत असून त्यात एकाचवेळी जास्तीत जास्त रोबोंच्या नृत्याचा विक्रम करण्याचा एक उद्देश आहे.
चीनमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये १०६९ डोबी यंत्रमानव म्हणजे रोबोटनी एकाचवेळी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली होती.
अलीकडचा विक्रम हा इटलीत झाला असून अल्फा १ एस रोबोंनी सामूहिक नृत्य केले. हे रोबो ४० सें.मी उंचीचे आहेत व ते अॅल्युमिनियमच्या संमिश्रापासून प्लास्टिक आवरणाने तयार केले आहेत. ह्य़ूमनॉइड रोबो चीनच्या उबटेक कंपनीने तयार केले असून याच रोबोंनी २०१६ मध्ये पहिला विक्रम केला होता.
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसचे लोरेन्झो वेल्ट्री यांनी या कार्यक्रमात निरीक्षक म्हणून काम केले. सर्व ह्य़ुमनॉइड रोबोच सारख्या वेळात न चुकता नृत्य करीत आहेत याची खातरजमा करण्यात आली. यातील अल्फा १ एस रोबो हे लवचिक असून ते नृत्यातील वेगवेगळ्या लयी संगीतानुसार बदलू शकतात असे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटले आहे.

नृत्य करणारे रोबो
- निर्माती कंपनी- उबटेक- चीन
- संख्या -१३७२
- रोबोटची उंची- ४० सें.मी
- रोबोटचे नाव -अल्फा १ एस
- आधीचा विक्रम- १०६९ डोबी रोबोट
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी