महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका यामध्ये महिला सक्षमा केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व पालिकांना निर्देश दिले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन अविरत प्रयत्नशील आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपला वाटा उचलला पाहिजे. त्यादृष्टिकोनातून स्थानिक स्वराज संस्थांनी सक्रिय सहभाग घेत स्त्री संसाधन केंद्र (जेंडर रिसोर्सेस सेंटर) उभारावे. त्यास सक्षमा कक्ष असे नाव देता येऊ शकेल, असे आयोगाने आपल्या निर्देशात म्हटले आहे.
राज्यातील महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, तसेच विभागीय आयुक्तांना स्त्री संसाधन केंद्रची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या शहरामध्ये स्त्री संसाधन केंद्र उभारून महिलांच्या अडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांच्यातील कौशल्याला वाव देणारी एक सक्षम यंत्रणा उभी करावी, हे या केंद्राच्या निर्मितीमागील उद्दिष्ट आहे.
महिलांविषयक विविध कायद्याचे मार्गदर्शन, समुपदेशन या केंद्रामार्फत केले जावे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थेने महिलांसाठी आखलेल्या योजनांची माहिती देणारा कक्ष या केंद्रात असावा, तसेच महिलांच्या कौशल्य विकासासाठी, आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, असे कार्यक्रम यामाध्यमातून राबविण्यात यावे. यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या दर्जाप्रमाणे आर्थिक तरतूद नव्या आर्थिक वर्षात करावी, याबाबत या सूचना करण्यात आल्या आहेत.

0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी