Search This Blog

Monday, 9 April 2018

धोनीने जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला पद्मभूषण

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी नवी दिल्लीत पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं. यावेळी महेंद्रसिंग धोनीने लेफ्टनंट कर्नलचा पोषाख घातला होता. महेंद्रसिंग धोनीने आपला हा सन्मान जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला आहे. धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे धोनीने बरोबर सात वर्षांपूर्वी २ एप्रिलला भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या विजयाच्या सातव्या वर्धापनदिनीच त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान देण्यात आला

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी