Search This Blog

Monday, 30 April 2018

थेट विक्री उद्योगात महाराष्ट्र अव्वल स्थानी

भारतातील थेट विक्री उद्योगात 2016-17मध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, गुजरात सहाव्या स्थानावर आहे. देशातील थेट विक्री उद्योगात महाराष्ट्राचा वाटा 12.89 टक्के असून, त्यापाठोपाठ पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे, तर 6.99 टक्के वाटा असलेला गुजरात सहाव्या क्रमांकावर आहे.
भारतीय थेट विक्री उद्योग संघटनेचा (आयडीएसए) 2016-17चा वार्षिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला असून, या उद्योगासमोर वस्तूंची थेट विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठे आव्हान निर्माण केले असल्याचे त्यात म्हटले आहे.
देशातील थेट विक्री उद्योगात एकट्या पश्‍चिम विभागाचा वाटा 24.6 टक्के आहे. पश्‍चिम विभागातही महाराष्ट्राने (52.3 टक्के) सर्वोत्तम कामगिरी नोंदविली असून, त्यापाठोपाठ गुजरातचा (28.4 टक्के) क्रमांक लागतो. थेट विक्री उद्योगामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ऍम्वे, ओरिफ्लेम आणि टपरवेअर अशा कंपन्यांचा या उद्योगात समावेश होतो. या उद्योगामध्ये 2016-17मध्ये दहा हजार 324 कोटी रुपयांची विक्री केली असून, मागील वर्षी ती आठ हजार 308 कोटी रुपये येवढी होती.

भारतातील थेट विक्री उद्योग (राज्यनिहाय टक्केवारी)
महाराष्ट्र : 12.89
प. बंगाल : 9.10
तमिळनाडू : 8.83
कर्नाटक : 7.81
उत्तर प्रदेश : 7.36
गुजरात : 6.99
[संदर्भ : लोकसत्ता ] 
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी