Search This Blog

Tuesday, 24 April 2018

मोहम्मद सलाह ‘सर्वोत्तम खेळाडू’

इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉलमध्ये लिव्हरपूलचा प्रमुख खेळाडू मोहम्मद सलाहने पदार्पणातच सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ४१ गोल करताना जेतेपदाचे दावेदार ठरलेल्या मँचेस्टर सिटीच्या केव्हिन डी ब्रुयनेलाही मागे टाकले. ‘‘हा माझा सन्मान आहे. मी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणून हा पुरस्कार मिळाला,’’ अशी प्रतिक्रिया सलाहने दिली.

शनिवारी झालेल्या लढतीत सलाहने वेस्ट ब्रोम्विचविरुद्ध गोल करताना ईपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक ३१ गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. ‘‘तुमच्या नावाची तुलना सतत अव्वल खेळाडूंशी केली जाते. प्रीमिअर लीगमधील विक्रम मोडणे ही इंग्लंड आणि जागतिक फुटबॉलच्या दृष्टीने मोठे यश आहे. अजूनही तीन सामने शिल्लक आहेत आणि तो विक्रम मोडण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे सलाह म्हणाला.

सलाहने चॅम्पियन्स लीगमध्येही आठ सामन्यांत सात गोल केले आहेत आणि त्यात लिव्हरपूल विरुद्ध मँचेस्टर सिटी यांच्यातील दोन्ही लीग लढतींचा समावेश आहे. रोमा क्लबविरुद्धच्या उपांत्य फेरीतही सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक आहे.

राष्ट्रीय संघातील निवडमे २०१०मध्ये १८ वर्षीय सलाहला वरिष्ठ राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला बदली खेळाडू म्हणूनचे खेळवण्यात यायचे. मात्र अनुभवाला गुरू मानणाऱ्या या खेळाडूचा खेळ दिवसेंदिवस सुधारत गेला. त्यानंतर तो संघाचा प्रमुख आक्रमणपटू बनला. २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत इजिप्तकडून सर्वाधिक पाच गोल त्याच्या नावावर आहेत.
फुटबॉलसाठी १० बस बदलायचासुरुवातीला केवळ छंद म्हणून जोपासलेला खेळ सलाहच्या आयुष्यचा भाग बनला. त्यानंतर त्याने स्थानिक क्लब ‘एल मोकावलून’मध्ये फुटबॉलचे धडे गिरवायला सुरुवात केली. घरापासून ते क्लबपर्यंत पोहोचायला त्याला पाच बस बदलाव्या लागायच्या आणि आठवडय़ातून पाच दिवस त्याचा हा प्रवास व्हायचा. अर्थात त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला. फुटबॉलसाठी दिवसाच्या आठ तासांच्या प्रवासाचे चक्र चार वर्षे सुरू होते.
चोरांना माफी आणि नोकरीअलेक्झांड्रिया येथे फुटबॉल सामना खेळत असताना सलाहच्या निग्रिग येथील राहत्या घरी चोरी झाली. काही दिवसांनी पोलिसांनी चोरांना पकडले. मात्र सलाहने आपल्या वडिलांना आरोप मागे घेण्याची विनंती केली. मग त्याने चोरांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली आणि पुढे जाऊन त्या चोरांना नोकरीसुद्धा मिळवून दिली.
क्लब कारकीर्द२०१२मध्ये इजिप्तिशियन प्रीमियर लीग गुंडाळण्यात आली आणि सलाहसह अनेक खेळाडूंचे भवितव्य टांगणीला लागले. त्या वेळी स्वित्र्झलडच्या बासेल क्लबने सलाहशी चार वर्षांचा करार केला. २०१२-१३ च्या स्वीस सुपर लीग विजयात बॅसेलच्या त्याने सिंहाचा वाटा उचलला. नंतर चेल्सी, फ्लोरेंटिना व रोमा अशा यशस्वी प्रवासानंतर सलाह लिव्हरपूलच्या चमूत दाखल झाला.
वैयक्तिक आयुष्य
  • १५ जून १९९२मध्ये इजिप्त येथील घर्बिया प्रांतातील नाग्रिग येथे सलाहचा जन्म झाला.
  • सलाहने इतरांप्रमाणे पारंपरिक आयुष्य जगावे, अशी पालकांची इच्छा, परंतु सलाहच्या डोक्यात फुटबॉलचे वेड होते.
  • मैदानावर नसतानाही दूरचित्रवाहिनीवर फुटबॉल पाहणे हा त्याचा छंद.
  • अभ्यासात त्याचे मन रमेना, त्यामुळे पालकही चिंतेत होते.
  • त्यांच्यासाठी अभ्यास आणि फुटबॉल यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी