Search This Blog

Monday, 9 April 2018

कावेरी वाद ...कावेरी मुद्दय़ावर द्रमुकतर्फे गुरुवारी तामिळनाडू बंद
केंद्राने कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी या मागणीसाठी द्रमुकच्या नेतृत्वात इतर विरोधकांनी ५ एप्रिलला तामिळनाडू बंदचे आवाहन केले आहे. याबाबत द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलीन यांनी बैठक बोलावली होती. या आंदोलनाला सर्वानी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला काँग्रेस, माकप, भाकपचे प्रतिनिधी उपस्थित होते. बंदनंतर कावेरी हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे स्टॅलीन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना तामिळनाडू भेटीवेळी काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना केली जात नसल्याबद्दल हा निर्णय घेण्यात आल्याचे स्टॅलीन यांनी सांगितले. राज्यातील अण्णा द्रमुकचे सरकार केंद्रापुढे हतबल असल्याचा आरोप स्टॅलीन यांनी केला. तामिळनाडू सरकार व केंद्राने कावेरी व्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेसाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानेकावेरीतून कर्नाटकला मिळणाऱ्या पाण्याचा वाटा वाढविला आहे.

‘..तर अण्णा द्रमुकचा केंद्रावर अविश्वास ठराव’

काँग्रेसने पाठिंबा दिल्यास अण्णा द्रमुक केंद्र सरकारविरोधात कावेरीच्या मुद्दय़ावर अविश्वास ठराव आणण्याचा विचार करेल, असे पक्षाचे नेते एम. थंबीदुराई यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे अण्णा द्रमुक केंद्राशी मैत्रीपूर्ण संबंध असताना त्यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जाते. संसदेत अण्णा द्रमुकने कावेरीच्या मुद्दय़ावर घोषणाबाजी केली होती.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी