Search This Blog

Wednesday, 25 April 2018

सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला वकील

वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान , सरकारने न्यायाधीश के.एम.जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत. २०१६ मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या खंडपीठात जोसेफ यांचा सहभाग होता.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कॉलेजियमने उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस केली होती. दोघांच्या बढतीबाबतची शिफारस जवळपास तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. २२ जानेवारी रोजी याबाबतची फाईल कायदा मंत्रालयाला मिळाली होती. मात्र, जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना इंदू यांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे.
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी