१९९५ च्या युनियन टेरिटोरी केडर चे IAS, चंद्रभूषण कुमार यांची पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडणूक आयोगामध्ये सध्या मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांच्यासह तीन सदस्य आहेत.
निवडणूक आयोगाविषयी
निवडणूक आयोगाविषयी
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडव्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.om prakasg ravat हे 22 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.
महत्त्वाची कर्तव्ये:
- मतदारसंघ आखणे
- मतदारयादी तयार करणे
- राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
- उमेदवारपत्रिका तपासणे
- निवडणुकी पार पाडणे
- उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे
- आता पर्यतचे निवनुक आयुक्त
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी