Search This Blog

Wednesday, 25 April 2018

बायच्युंग भूतिया करणार राजकीय पक्षाची स्थापना

काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भारतीय फुटबॉल टीमचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया सिक्कीममध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापना करणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ़ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. हा प्रादेशिक पक्ष असून सिक्किमच्या हितासाठी काम करणार आहे.

तसेच उद्या भूतिया आपल्या नविन पक्षाची घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत माझी पुढची वाटचाल जाहीर करणार आहे. सिक्कीम नव्या बदलासाठी तयार आहे हे मला राष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवायचं आहे असं बायच्युंग भूतियाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या फेसबुक लाईव्हमध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन बायच्युंग भूतियाने केले आहे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला बायच्युंग भूतियाने आपण तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देत असल्याचे ट्विटरद्वारे जाहीर केले होते. व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने २०१३ मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये बायच्युंग भूतियाने तृणमूलकडून दार्जिलिंग मतदारसंघातून लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली होती. परंतू भूतियाला भाजपच्या के एस एस अहलुवालिया यांच्याकडून हार पत्करावी लागली होती.
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी