Search This Blog

Monday, 9 April 2018

भाजपाकडून काँग्रेसचे अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्तीगुजरातमधील भाजपा सरकारने राजकीय वाद विसरत काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांना गुजरात वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त केले आहे. पटेल यांच्यासह दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांच्याबरोबर सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतरही त्यांना सदस्यत्व दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. मागील वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठ्या मुश्किलीने पटेल निवडून आले होते. निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर पटेल यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. त्याचबरोबर वांकानेरचे काँग्रेसचे आमदार मोहम्मद जावेद पीरजादा यांनाही मंडळात स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही काँग्रेस नेत्यांशिवाय सज्जाद हिरा, अफजल खान पठाण, अमाद भाई जाट, रूकैय्या गुलाम हुसेनवाला, बद्रउद्दीन हलानी, मिर्जा साजिद हुसेन, सिराज भाई मकडिया आणि आसमां खान पठान यांचा समावेश आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी