Search This Blog

Monday, 9 April 2018

अमूल डेअरीच्या ‘एमडीं’चा राजीनामा

सहकार क्षेत्रातील आदर्श समजल्या जाणाऱ्या आणंद (गुजरात) येथील अमूल डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक के. रत्नम यांनी राजीनामा दिला आहे. निविदा वाटप आणि डेअरीतील भरती प्रक्रियेत ४५० कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप रत्नम यांच्यावर होता. याचदरम्यान त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, रत्नम यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयन मेहता यांची प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे अमूल डेअरीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जयन मेहता हे वरिष्ठ महा व्यवस्थापक (नियोजन आणि विपणन) म्हणून सध्या अमूलमध्ये कार्यरत आहेत. रथनाम यांनी चार वर्षे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी